कुटुंबालाच पोलीस वर्दींची परंपरा ! डीवायएसपी झालेल्या लेकीला सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक वडिलांचा सॅल्यूट :- सहाय्यक पोलीस न...
कुटुंबालाच पोलीस वर्दींची परंपरा ! डीवायएसपी झालेल्या लेकीला सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक वडिलांचा सॅल्यूट :- सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले!
सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र पोलीस खात्यात नेहमीच प्रयत्नशील असणारे आणि सातारा जिल्हा पोलीस दलातील तळबीड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. किरण भोसले हे सातारा जिल्हा पोलीस कार्यरत आहेत. मात्र आपल्या नुकत्याच डीवायएसपी झालेल्या कन्या सायली हिला सॅल्यूट देताना वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनाही पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली आहे. सध्या सातारा जिल्हा पोलीस दलात असणारे पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी आपल्या नुकत्याच झालेल्या डीवायएसपी लेकीला म्हणजे सायली भोसले हिला सॅल्यूट केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यांत सायली भोसले या दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या यामध्ये त्यांची डीवायएसपी पदी निवड झाली आहे. डीवायएसपी झालेल्या आपल्या लेकीला पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी अभिमानाने सॅल्यूट केला आहे. विशेष म्हणजे भोसले कुटुंबाची ही चौथी पिढी पोलीस दलात कार्यरत झाली आहे. भोसले कुटुंबाच्या रक्तातातच देशसेवा भिनली आहे. कसबा बावडा येथील सायली रूपाली किरण भोसले यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे कोल्हापूर येथे झाले आहे. त्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटी मधून इएनटीसी ही इंजिनियरिंग पदवी प्राप्त केली. त्यांनी क्लासेस व स्वतःच्या घरी अतिशय जिद्दीने अभ्यास केला. खडतर अभ्यास करत वाचन आणि अधिकारी बनण्याची जिद्द तिच्या कायम मनात होती. या गोष्टीमुळे सायली भोसले यांनी 2014 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. दरम्यान पोलीस निरीक्षक किरण भोसले यांचे आजोबा व वडील हे दोघेही पोलीस दलात होते तर स्वतः किरण भोसले कराड तालुक्यांतील तळबीड या ठिकाणी सध्या पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. भोसले कुटुंबाचा हा आदर्श समाजातील इतर कुटुंबांनी नक्कीच घेण्यासारखा आहे. स्वतः पोलीस दलात निरीक्षकपदी कार्यरत असतानाच पोलीस विभागात आपल्यापेक्षा मोठ्या पदावर आपलीच मुलगी जर पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) म्हणून निवड झाली तर जीवनात यापेक्षा कोणते सार्थक नाही त्यामुळे त्यांनी आपल्या अभिमानाने आपल्या लेकीला सॅल्यूट केला आहे. आदरणीय डीवायएसपी सायली भोसले यांना पुढील सेवेसाठी आमच्या रोखठोक महाराष्ट्र धमाका ग्रुपकडूंन मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा आहेत.

No comments