निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई...गावठी कट्टा व लोखंडी कोयत्याने दहशत माजवणारी टोळी गजाआड सचिन मोकळं अहिल्यानगर...
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई...गावठी कट्टा व लोखंडी कोयत्याने दहशत माजवणारी टोळी गजाआड
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (१५):-एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारां विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनने मोठी व निर्णायक कारवाई करत दत्तनगर वडगाव गुप्ता शिवरात गावठी कट्टा तसेच लोखंडी कोयत्याने दहशत माजवणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.या कारवाईत पोलिसांनी एक गावठी कट्टा,एक जिवंत काडतूस व तीन लोखंडी कोयते हस्तगत केले आहेत.दि. १४ जानेवारी २०२६ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की,दत्तनगर वडगाव गुप्ता शिवरात परिसरात काही इसम गावठी कट्टा व लोखंडी कोयते घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहेत.सदर माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात दिले.एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचून संशयितांवर झडप घातली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.झडती दरम्यान आरोपींकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस व तीन लोखंडी कोयते मिळून आले. हर्षद गौतम गायकवाड (रा.दत्तनगर वडगाव गुप्ता,जि.अहिल्यानगर), वैभव गौतम गायकवाड, भूषण चंद्रकांत गाढवे, मंजीत मदनलाल किसाना, स्वप्निल व्यंकटेश मेहेत्रे, असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. तपासात निष्पन्न झाले की, सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता, आर्म्स अॅक्ट तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग शिरीष वमने, यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस अंमलदार राकेश खेडकर, संदीप पवार, राजू सुद्रिक, सचिन अडबल, टेमकर, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, ज्ञानेश्वर आघाव, अक्षय रोहकले यांनी केली आहे.

No comments