शेगाव येथील माजी सैनिक कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ! अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शेगाव येथील माजी सै...
शेगाव येथील माजी सैनिक कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शेगाव येथील माजी सैनिक कार्यालय परिसरात भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर शेगाव नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार व नगरसेवकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रूपाली गणेश मानमोडे (सेवानिवृत्त स्क्वॉड्रन लीडर), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलढाणा उपस्थित होत्या. तसेच रंजन कोंडी सरकटे (कल्याण संघटक) व दिलीप काशिनाथ वावगे (लिपिक-टंकलेखक) यांची प्रमुख उपस्थिती होती. अर्जुन गाडेकर व प्रदीप सपकाळ यांनीही कार्यक्रमास उपस्थिती नोंदविली.
माजी सैनिक संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार, उपनगराध्यक्षा वैशालीताई सूळ तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष नितीन शेगोकार यांनी आपल्या मनोगतात माजी सैनिकांच्या कार्याचे कौतुक केले. नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांनी आपल्या भाषणात माजी सैनिक संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात नगर परिषद खंबीरपणे पाठीशी राहील व आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.
प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने लहान मुलांसाठी विविध छोट्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच माजी सैनिक गुणवंत मुलांचा माजी सैनिक संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष हॅलोडे साहेब, सरदार साहेब, वडोदकर साहेब, पहुरकर साहेब, सुरडकर साहेब, बाळू सरदार साहेब, युवराज शेगोकार साहेब, इंगळे साहेब, मारोडे साहेब, पिसे साहेब, गवई साहेब, दामोदर साहेब, गुरव साहेब, घोगले साहेब, खेते साहेब, तायडे साहेब, नागोलकर साहेब व दिलीप वानखेडे साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक भोजनाने करण्यात आली. या सोहळ्यास परिसरातील नागरिक व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments