adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

🇮🇳 विचखेडा ग्रामपंचायतीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप 🇮🇳

  🇮🇳 विचखेडा ग्रामपंचायतीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप   🇮🇳 चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:...

  🇮🇳 विचखेडा ग्रामपंचायतीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप  🇮🇳



चंद्रकांत पाटील विचखेडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

गृप ग्रामपंचायत विचखेडा–धुपे खु. येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता ग्रामपंचायत कार्यालय विचखेडा येथे तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीचे संचालक चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजपूजन करून सलामी देत ध्वजारोहण करण्यात आले.

तसेच जिल्हा परिषद मराठी शाळा विचखेडा येथे सुरेश तुळशीराम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी सावित्रीबाई रामदास पाटील बहुउद्देशीय संस्था, चहार्डी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हे वाटप लोकनियुक्त सरपंच रवींद्र पाटील यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव भगवान (गुरुजी) दत्तू पाटील, अध्यक्ष दत्तात्रय श्रावण पाटील (एरंडोल), उपाध्यक्ष रवींद्र सिताराम पाटील यांच्यासह दिवाण पाटील, तुषार पवार सर, विजय बोरसे, प्रताप न्हावी, सोपान पाटील, संदेश शिरसाठ, सुरेखाबाई पाटील उपस्थित होते. तसेच अंगणवाडी शिक्षिका मिनाबाई पाटील, मदतनीस अनिता शिरसाठ व आशा वर्कर न्याहाळोदे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य केले. 

No comments