रासेयो हे संस्कारक्षम तरूण घडविण्याचे साधन पारोळा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जनसेवा हा प्रमुख हेतू लक्षात घेऊन रासेयो संपुर्ण ...
रासेयो हे संस्कारक्षम तरूण घडविण्याचे साधन
पारोळा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जनसेवा हा प्रमुख हेतू लक्षात घेऊन रासेयो संपुर्ण भारतभर समाजाची निष्ठापुर्वक सेवा करीत आहे. स्वयंसेवकांच्या सहकार्याने विविध आव्हानात्मक परिस्थितीत अनेक उल्लेखनीय आणि प्रसंशनीय कामगिरी करत आलेला असून रासेयो एकक हे संस्कारक्षम तरूण घडविण्याचे सर्वोत्तम साधन असल्याचे मत डॉ.सतिश पाटील यांनी व्यक्त केले. कबचौ उमवि जळगाव संलग्नित किसान महाविद्यालयातील रासेयो एककाद्वारे मोंढाळे पींप्री (ता. पारोळा) येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजनाच्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. शिबिराचे उद्घाटन दत्तक गाव मोंढाळे गावातील माजी सैनिक नाना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. काकासाहेब गायकवाड यांनी सात दिवसीय शिबीराचे उद्देश, एकुण नियोजन आणि शिबीरातून राबविले जाणारे समाजाभिमुख उपक्रमांची माहीती सांगितली. प्रमुख पाहुणे म्हणून मोंढाळे गावाच्या सरपंच शितल पाटील, शासकीय अभियंता अनिल पाटील, रा. काॅ. पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ. शांताराम पाटील, बाजार समिती संचालक मनोराज पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.एच. सोनवणे उपसरपंच, सर्व ग्रा. सदस्य, ग्रामसेवक, जि. प. शाळा मुख्याध्यापिका, पोलीस पाटील. वि. का. सो. चे अध्यक्ष व संचालक मंडळ आणि परीसरातील आजी माजी सरपंच उपस्थित होते. मार्गदर्शनपर मनोगतातून अनिल पाटील यांनी स्वच्छतेचे महत्त्व तर डॉ. शांताराम पाटील यांनी गावपरीसरात एनएसएस शिबिराने केलेल्या कौतुकास्पद कार्याचा उल्लेख केला. मनोराज पाटील यांनी किसान महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून मनोगत व्यक्त करतांना दैनंदिन जीवनातील अर्थाजनाची गरज आणि जिद्द व चिकाटीने महत्त्व यावर प्रकाश टाकला तर उपप्राचार्य डॉ.जी.एच. सोनवणे यांनी श्रमसंस्कार या संकल्पनेवर विचारमंथन केले. दुपारच्या सत्रात डॉ. अनिता मुडावदकर यांनी महीला सक्षमीकरण या विषयावर तर डॉ. हितेश पवार यांनी या डिजीटल व वित्तीय साक्षरता विषयावर स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता चौधरी यांनी तर आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. शशिकांत पाटील यांनी केले.

No comments