मजरेहोळ येथे साईबाबा मंदिराचा 25 वा वर्धापन दिनानिमित्त भव्य सोहळा. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- तालुक्यातील प्रति...
मजरेहोळ येथे साईबाबा मंदिराचा 25 वा वर्धापन दिनानिमित्त भव्य सोहळा.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- तालुक्यातील प्रति शिर्डी समजल्या जाणाऱ्या मजरेहोळ येथील साई बाबांच्या मंदिराचा 25वा वर्धापनदिन(रौप्य महोत्सव) दिनांक 21 व 22फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार असून दिनांक 21रोजी मजरेहोळ येथे संध्याकाळी पाच वाजेला भव्य अशी शोभायात्रा व पायीदिंडी निघणार असून हजारो भाविक भक्त यात सहभागी होणार आहेत.
22फेब्रुवारी रोजी सकाळी 10वाजेला श्री सत्यनारायणाची महापुजा आणि साई भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आले आहे. साईबाबांच्या वर्धापनदिनानिमित्त 22रोजी रात्री आठ वाजेला कीर्तनकार कीर्तन केसरी ह.भ.प.विशालजी महाराज खोले(मुक्ताईनगर)यांचे कीर्तन होणार असून तालुक्यातील साईभक्तांनी जास्तीतजास्त मोठ्या संख्येने महाप्रसादाचा व कीर्तनाचा लाभ घ्यावा अस आवाहन साई ग्रामस्थ मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले असून या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अरुणभाई गुजराथी(माजी विधानसभा अध्यक्ष) महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबरावजी पाटील साहेब,तालुक्याचे लोकप्रिय आमदार प्रा.चंद्रकांतजी सोनवणे साहेब,चोपडा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.नम्रता सचिन पाटील,आणि नगरसेवक पियुष चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा.

No comments