adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मौजे केंदूर येथे बेकायदेशीर ऑनलाइन जुगार प्रकरण उघड; दोन जण ताब्यात, ३.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

  मौजे केंदूर येथे बेकायदेशीर ऑनलाइन जुगार प्रकरण उघड; दोन जण ताब्यात, ३.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त  शिरूर (जि. पुणे) प्रतिनिधी (संपादक -:- ह...

 मौजे केंदूर येथे बेकायदेशीर ऑनलाइन जुगार प्रकरण उघड; दोन जण ताब्यात, ३.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त 


शिरूर (जि. पुणे) प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शिरूर (जि. पुणे) : मौजे केंदूर ता. शिरूर जि. पुणे येथे बेकायदेशीर ऑनलाइन ‘फन गेम’च्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून ३ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दहशतवाद विरोधी पथक, पुणे ग्रामीण आणि शिक्रापूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने केली.

दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे १) अमोल जयसिंग साकोरे (वय ३२) रा. शिळकवाडी, केंदूर ता. शिरूर जि. पुणे व २) अक्षय रघुनाथ साकोरे (वय २५) रा. शिळकवाडी, केंदूर ता. शिरूर जि. पुणे अशी आहेत.

दहशतवाद विरोधी शाखा, पुणे ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार हे आपल्या पथकासह शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की केंदूर येथे ‘फन गेम’ नावाच्या ऑनलाइन खेळाच्या माध्यमातून बेकायदेशीर जुगार चालवून आर्थिक फसवणूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पथकाने शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले.

या कारवाईत संशयितांकडून १ लाख ५३ हजार ५०० रुपये रोख रक्कम व ५ मोबाईल हँडसेट असा एकूण ३ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर करीत आहेत. ही कारवाई संदीप सिंह गिल्ल, रमेश चोपडे, प्रशांत ढोले तसेच दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार निलेश कदम, विशाल भोरडे, ओंकार शिंदे, गणेश चंदनशिव तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर, रोहिदास पारखे व पोलीस शिपाई विशाल देशमुख यांच्या पथकाने केली.

No comments