adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पौड चौकीत 35 हजारांची लाच, सोलापूरच्या एसीबीची धडक कारवाई !

पौड चौकीत 35 हजारांची लाच, सोलापूरच्या एसीबीची धडक कारवाई !   संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आरोपी...

पौड चौकीत 35 हजारांची लाच, सोलापूरच्या एसीबीची धडक कारवाई !  


संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आरोपींच्या गाडी जप्त न करता त्याला मदत करण्यासाठी 35 हजारांची लाच घेताना एका पोलीस जमादाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. सचिन बाळासाहेब शिंदे असे अटक करण्यात आलेल्या पोलीस जमादारांचे नाव आहे. तो सध्या पौड पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. शिंदे याने 35 हजार रुपयांची लाच घेताना पौड पोलीस चौकीत सोलापूरच्या लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. त्यांनी एका गुन्ह्यातील आरोपींच्या मदतीसाठी त्यांच्याकडे एक लाखांची लाच मागितली होती. त्यानंतर 35 हजारांवर अंतिम तोडजोड झाली. मात्र या प्रकरणात पुणे एसीबीने कारवाई केली नाही. पण सोलापूरच्या एसीबीने ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील तक्रारदारांने पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लाचखोर सचिन शिंदे वरील या गुन्ह्याचा तपास पुणे एसीबीच्या पोलीस निरीक्षक शैलेजा शिंदे करीत आहेत.

No comments