adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भुईंज पोलिसांकडून 6 लाख 70 हजार रूपयांचे मोबाईल मूळ मालकांना परत, भुईंज पोलिसांची दमदार कामगिरी!

  भुईंज पोलिसांकडून 6 लाख 70 हजार रूपयांचे मोबाईल मूळ मालकांना परत, भुईंज पोलिसांची दमदार कामगिरी!   सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सातारा जि...

 भुईंज पोलिसांकडून 6 लाख 70 हजार रूपयांचे मोबाईल मूळ मालकांना परत, भुईंज पोलिसांची दमदार कामगिरी!


 

सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

भुईंज पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये नागरिकांचे गहाळ झालेले 6 70,000/- रुपये किंमतीचे एकूण 30 मोबाईल हस्तगत करण्यात भुईंज पोलिसांना यश मिळाले आहे. भुईंज पोलीस ठाणे हद्दीमध्ये पाचवड, भुईंज अशी मुख्य बाजारपेठ असून आजूबाजूच्या गावातुन हजारोंच्या संख्येने लोक खरेदी, विक्री करिता येत-जात असतात. प्रवासादरम्यान तसेच इतर ठिकाणी त्यांचे मोबाईल फोन गहाळ होण्याचे प्रमाण अधिक वाढले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ.वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी  सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे यांनी पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेणे करिता पोलीस ठाणेकडील डी.बी. पथकांस सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार डी.बी. पथकांतील पो.कॉ. आकाश कुंभार, सागर मोहिते यांनी सी. ई.आय आर, पोर्टल व इतर तांत्रिक माहिंतीच्या आधारे महाराष्ट्रांसह इतर राज्यांतून गहाळ झालेले मोबाईल फोन वापरत असलेल्या मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करून शिताफीने ही सदरची मोहीम राबवून भुईंज पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले 6 70,000 /- रुपये किंमतीचे एकूण 30 स्मार्ट फोन हस्तगत करण्यात यश आले आहे.

यामध्ये एक आयफोन-14 प्रो-मॅक्स हा महागडा मोबाईल देखील हस्तगत करण्यात आला आहे.यापुढे अशाच प्रकारची गहाळ झालेले मोबाईल फोन शोधण्याची मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे यांनी सांगितले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक, भुईंज पोलीस ठाणे यांनी सांगितले आहे. सदरची कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली  स.पो.नि. पृथ्वीराज ताटे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील सुरेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक, स.पो.फौ.टकले, पो.हवा.नितीन जाधव,पो.हवा. कोलवडकर,पो.कॉ. वाघमोडे, पो.कॉ. रमेश बरके,पो.कॉ. बल्लाळ,पो.कॉ. निंबाळकर यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.भुईज पोलिसांच्या या कामगिरीबद्दल जनतेंतून विशेष कौतुक होत आहे.

No comments