रहिमतपूर पोलीस ठाण्यात खमक्या अधिकारी, स.पो.नि.विनोद नेवसे यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला! सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सा...
रहिमतपूर पोलीस ठाण्यात खमक्या अधिकारी, स.पो.नि.विनोद नेवसे यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला!
सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सातारा जिल्हा)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पोलीस दलातील जवळपास तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या असून या बदल्यांमध्ये जिल्ह्याला नव्याने तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस निरीक्षक मिळाला आहे. यामध्ये स.पो.नि. अक्षय सोनवणे स.पो.नि. चेतन्य मछले स.पो.नि.सचिन कांडगे यांचा समावेश असून. या बदल्यात सोलापूर ग्रामीण पुणे ग्रामीण आणि सांगली येथील अधिकाऱ्यांना सातारा बदली मिळाली आहे. तर रहिमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी जवळपास दोन वर्षाचा कार्यकाळ रहिमतपूरकरांसाठी नेहमीच सुरक्षित आणि प्रयत्नशील ठरला आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक मोहीम राबवून तसेच निवडणुका सण उत्सव काळात चोख बंदोबस्त होता. रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनतेची मन त्यांनी चांगलीच जिंकली होती. त्यांच्याबद्दल शब्द कमी पडतील, आणि खाकी वर्दीतील आपलेपणा जपणारे अधिकारी म्हणून सचिन कांडगे यांना ओळखले जाते. त्यांच्या बदलीनेही रहिमतपूरकरांना धक्का बसला आहे. अनेकांच्या प्रतिक्रिया साहेब आपली बदली थांबवा अशी हाक आहे. त्यांची पुणे ग्रामीणकडे बदली झाली आहे. तर त्यांच्या जागेवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे स.पो.नि. विनोद नेवसे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशावरून रहिमतपूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीनेही रहिमतपूर पोलीस ठाण्याला पुन्हा एकदा खमक्या अधिकारी मिळाला आहे.

No comments