adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस अवघ्या 8 तासांत आरोपींच्या रहिमतपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 2 लाख 70 हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत !

 जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस अवघ्या 8 तासांत आरोपींच्या रहिमतपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 2 लाख 70 हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत !...

 जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस अवघ्या 8 तासांत आरोपींच्या रहिमतपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 2 लाख 70 हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत ! 


 सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 रहिमतपूर पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांनी नुकताच रहिमतपूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून. रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सध्या अवैध धंदे, तसेच गुन्हेगारांचे देखील चांगलेच धाबे दणाणले आहेत. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या 8 तासांत आरोपींच्या रहिमतपूर पोलिसांकडून या कारवाईमध्ये जवळपास दोन लाख 70 हजार रुपये सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स.पो.नि. विनोद नेवसे यांच्या मार्गदर्शनात पहिल्याच कारवाईमुळे रहिमतपूरच्या जनतेंतून विशेष कौतुक होत आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून फिर्यादी अजय विठ्ठल गाडे (वय 37 ) यांना अज्ञात इसमांने रहिमतपूर कोरेगांव रस्त्यावर लिफ्टचा बहाणा करून ही जबरी चोरी केली होती यावेळी फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन असा सुमारे सोन्याचा मुद्देमाल जबरी करून पळून गेला होता. याबाबत रहिमतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती. दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने रहिमतपूर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांनी आपल्या पोलिस ठाणेकडील पोलिसांना सदर गुन्ह्याबाबत सूचना केल्या असता. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत अखेर आरोपी पर्यंत पोलिसांना पोहोचण्यात यश आले मुद्देमालसह आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. सदरची कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री तेरणे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे पो.कॉ. सचिन माने प्रवीण बर्गे सुशांत शिंदे महेश देशमुख दीपक देशमुख तुषार कांळगे यांच्यासह रहिमतपूर पोलीस ठाणेकडील आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे.

No comments