कमळगाव जिल्हा परिषद शाळेत बालआनंद मेळावा उत्साहात विद्यार्थ्यांनी घेतले खरेदी-विक्री व व्यवहाराचे प्रत्यक्ष धडे चोपडा प्रतिनिधी (संपादक -:...
कमळगाव जिल्हा परिषद शाळेत बालआनंद मेळावा उत्साहात
विद्यार्थ्यांनी घेतले खरेदी-विक्री व व्यवहाराचे प्रत्यक्ष धडे
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा: तालुक्यातील कमळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत बालआनंद मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक, उपशिक्षक तसेच कमळगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. मेळाव्यात सुमारे ४० ते ५० विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. पाणीपुरी, इडली, आलूपुरी, पोहे, मटकी उसळ, भेळ, शेंगदाणा चिक्की, पाववडा, समोसे, आप्पे, शेंगदाणा लाडू, नागली पापड, तांदळाचे पापड, शेव-चिवडा, गोडबोरे आदी पदार्थांची विक्री विद्यार्थ्यांनी स्वतः केली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री, नफा-तोटा, पैशांचे नियोजन आणि व्यवहारज्ञानाचे प्रत्यक्ष धडे मिळाले. प्रत्यक्ष व्यवहारातून आत्मविश्वास वाढवणे व आर्थिक जाणीव निर्माण करणे हा मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. उपशिक्षक भास्कर पाटील यांनी बालआनंद मेळाव्याचे उद्दिष्ट पालकांसमोर स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक केवलदास महाजन यांनी मानले. तसेच शिक्षक समाधान बोरसे व रमेश शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी पालक, महिला सदस्य, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यामुळे शाळा परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

No comments