कै. द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांचे ऑलिम्पियाड (गणित) परीक्षेत घवघवीत यश. जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (स...
कै. द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांचे ऑलिम्पियाड (गणित) परीक्षेत घवघवीत यश.
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कै. द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विद्यार्थ्यांनी ऑलिम्पियाड परीक्षेत सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले. त्यात Pre-primary च्या विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवून सुवर्णपदक, रौप्यपदक पटकावले आहे तसेच इ.1ली ते 4थी च्या विद्यार्थ्यांनीही चांगले गुण मिळवून पदके पटकाविली आहेत. इ. 4थी च्या भूषण नवनाथ महाजन या विद्यार्थ्याने 91.04 गुण मिळवून दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन या परीक्षे साठी भावना इंदलकर व मुख्याध्यापक सौ. संगीता पाटील मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले.
No comments