संरक्षण मजूर दिनेश कोळी यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान वैजापूर, ता. चोपडा — दिनेश कोळी यांना ट्रॉफी व सन्मानपत्र प्रदान करताना सहाय्यक उपवन...
![]() |
| वैजापूर, ता. चोपडा — दिनेश कोळी यांना ट्रॉफी व सन्मानपत्र प्रदान करताना सहाय्यक उपवनसंरक्षक एम. बी. पाटील, समवेत वनक्षेत्रपाल विकेश ठाकरे |
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वैजापूर रेंजमध्ये संरक्षण मजूर म्हणून कार्यरत असलेले दिनेश दोधू कोळी यांचा वनसंवर्धन व वनसंरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेबद्दल सन्मान करण्यात आला. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. हा सन्मान समारंभ सहाय्यक उपवनसंरक्षक एम. बी. पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी वैजापूरचे वनक्षेत्रपाल विकेश ठाकरे तसेच चोपडा येथील वनक्षेत्रपाल बी. के. थोरात उपस्थित होते. दिनेश कोळी हे गेल्या काही वर्षांपासून वनसंवर्धन, वनसंरक्षण तसेच वनसंपत्तीच्या रक्षणासाठी प्रामाणिकपणे कार्यरत असून त्यांच्या कार्यामुळे परिसरातील वनक्षेत्र सुरक्षित राहण्यास मोठी मदत झाली आहे. त्यांच्या या मोलाच्या योगदानाची दखल घेऊन करण्यात आलेल्या सत्कारामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

No comments