adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

  ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार  विकास पाटील धरणगाव  (संपादक -:- हेमकां...

 ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार 


विकास पाटील धरणगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : भारतीय जनता पार्टी कायदा आघाडीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड. वसंतराव शिवदास भोलाणे यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल धरणगाव न्यायालयाच्या वकील संघटनेतर्फे त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी धरणगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र येवले, विद्यमान अध्यक्ष ॲड. महेंद्र चौधरी, सचिव ॲड. गणेश मांडगे, अर्बन बँकेचे तज्ञ संचालक ॲड.गजानन पाटील, ॲड. संदीप सुतारे, ॲड. बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कारप्रसंगी उपस्थितांनी ॲड. भोलाणे यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व बँकिंगसह कायदेशीर आणि पत्रकारिता क्षेत्रात संघटनात्मक कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्हा पातळीवर कायदा आघाडीच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करत न्याय व्यवस्थेशी संबंधित प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे कार्य त्यांच्या हातून घडेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. आपल्या मनोगतात ॲड.भोलाणे यांनी सर्व सहकारी वकील बांधवांचे आभार मानत, पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करून संघटन विस्तार व सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्धार व्यक्त केला. सत्कार सन्मान कार्यक्रम यशस्वीतेसाठी धरणगाव वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments