जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने उंब्रज पोलिसांचा रूट मार्च ! ग्रामीण भागातही कडक बंदोबस्त, स.पो.नि.रवींद्र भोरे ! संभाजी ...
जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने उंब्रज पोलिसांचा रूट मार्च ! ग्रामीण भागातही कडक बंदोबस्त, स.पो.नि.रवींद्र भोरे !
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सन 2026 सर्वत्रिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्या अनुषंगाने निवडणूक काळात सातारा पोलिस आणि महसूल प्रशासनही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ग्रामीण भागातील काही संवेदनशील गावामध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उंब्रज पोलीस ठाण्याच्या ग्रामीण भागात आणि उंब्रज शहरांत पोलीस ठाणे यांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात जातीय दंगा काबू पथकांचा सराव करण्यात आला. सदर रूट मार्च हा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कुडकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री पाटील मॅडम उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी आपल्या पोलिस ठाणेकडील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह स्वता: या रूट मार्चमध्ये सहभाग नोंदवून पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्चमध्ये आरोग्य विभाग अग्निशामक दलाचे कर्मचारी, असे अधिकारी 47 पोलिस अंमलदार 1 आरसीपी पथक 7 शासकीय वाहने या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गावांमध्ये कडक बंदोबस्त राहणार असल्याचेही सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी सांगितले आहे.

No comments