सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी नातेपुते पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला,पोलीस ठाण्याला मिळाला खमक्या अधिकारी! सौ. शुभांगी सरोदे-प...
सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी नातेपुते पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला,पोलीस ठाण्याला मिळाला खमक्या अधिकारी!
सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी ( सोलापूर जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सोलापूर ग्रामीण पोलीस दलात दोन दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी काही अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. यामध्ये स.पो.नि. महारुद्र परजणे यांची सातारला बदली झाली असून. त्यांच्या रिक्त जागेवर नातेपुते पोलीस ठाण्याला ग्रामीण शाखा गुन्हेकडील कार्यरत असणारे स.पो.नि. विशाल वायकर यांच्याकडे नातेपुते पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी शनिवारी मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्याकडून नातेपुते पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. विशाल वायकर हे एक कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग अधिकारी म्हणून पोलीस खात्यात ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी सातारा जिल्हा पोलीस दलातही शाहूपुरी लोणंद अशा पोलीस ठाण्यातही उत्कृंष्ट सेवा दिली. जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्णता: झाल्यामुळे त्यांची सोलापूर ग्रामीण ला बदली झाली होती. आज त्यांनी नातेपुते पोलीस ठाणे चा पदभार स्वीकारून तसा अहवाल पोलीस मुख्यालयाकडे सादर केला आहे. त्यांच्या नियुक्तीने नातेपुते पोलीस ठाण्याला आता खमक्या अधिकारी मिळाल्याचे जनतेतून बोलले जात आहे. तर यापूर्वीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे यांनीही नातेपुते पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले तसेच गुन्हेगारींवर चांगलेच नियंत्रण ठेवले होते.

No comments