स.पो.नि. बसवेश्वर जकिकोरे कामती पोलीस ठाणे तर स.पो.नि. रोहित शिंदे माढा पोलीस ठाणे पदभार स्वीकारला ! संभाजी पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प...
स.पो.नि. बसवेश्वर जकिकोरे कामती पोलीस ठाणे तर स.पो.नि. रोहित शिंदे माढा पोलीस ठाणे पदभार स्वीकारला !
संभाजी पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील आज रोजी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरून पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये स.पो.नि.बसवेश्वर जकिकोरे (नियंत्रण कक्ष ते कामती पोलीस ठाणे,) स.पो.नि. आशिष कांबळे (पंढरपूर शहर पोलीस ठाणे ते वेळापूर पोलीस ठाणे) स.पो.नि. (विशाल वायकर स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण ते नातेपुते पोलीस ठाणे) स.पो.नि. भाऊसाहेब गोसावी वेळापूर (वेळापूर पोलीस ठाणे ते स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण) स.पो.नि. रोहित शिंदे (करमाळा पोलीस ठाणे ते माढा पोलीस ठाणे) वरील पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कामती पोलीस ठाण्यात स.पो.नि. बसवेश्वर जकिकोरे यांनी पहिल्याच दिवशी स.पो.नि. ज्ञानेश्वर उदार यांच्याकडून कामती पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. स.पो.नि. बसवेश्वर जकिकोरे हे एक पोलीस खात्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. कामती पोलीस ठाण्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांतून सांगितले आहे. तर स.पो.नि. रोहित शिंदे हे यापूर्वी करमाळा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यांनी स.पो.नि. सुरज बंडगर यांच्याकडून माढा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. त्यांनीही पदभार घेताच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस दलात शुक्रवारी झालेल्या वेळापूर नातेपुते कामती माढा मंद्रूप आणि मोहोळ अशा पोलीस ठाण्यांना नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या होत्या. या झालेल्या बदल्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरून तत्काळ आपल्या नव्या पदस्थापने ठिकाणी पदभार स्वीकारून पोलीस मुख्यालयास अहवाल सादर केला आहे.

No comments