adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

थोर विचारवंत माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांची १०१ वी जयंती उत्साहात साजरी

 थोर विचारवंत माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांची १०१ वी जयंती उत्साहात साजरी  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर:...

 थोर विचारवंत माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांची १०१ वी जयंती उत्साहात साजरी 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:- प्रगल्भ विचारवंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निष्ठावान अनुयायी आणि सामाजिक चळवळीचे खंबीर नेतृत्व स्व. दादासाहेब रुपवते यांची १०१ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात सिंधू एज्युकेशन अँड वेलफेअर अकॅडमी संचलित साळवे क्लासेस मध्ये  साजरी करण्यात आली. या निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला. संस्थेच्या संचालिका सौ. भारती साळवे यांनी दादासाहेबांच्या कार्याचा गौरव केला.कार्यक्रमाची सुरुवात दादासाहेब रुपवते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

याप्रसंगी बोलताना सौ. भारती साळवे म्हणाल्या, "दादासाहेब रुपवते यांनी आयुष्यभर समता आणि न्यायासाठी लढा दिला. त्यांचे विचार आजच्या पिढीला मार्गदर्शक आहेत. शिक्षण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी घातलेला पाया आजही भक्कम आहे." दादासाहेब रुपवते यांनी केवळ राजकारणातच नव्हे, तर साहित्य आणि सामाजिक चळवळीतही मोठे योगदान दिले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता आणि १०१ व्या जयंतीचा प्रारंभ हा समाजघटकांसाठी एक प्रेरणेचा क्षण ठरला आहे.या  कार्यक्रमास सौ सविता सांगळे (जिल्हा न्यायालय ), सो योगिता बाकले आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अर्पिता कांबळे (शहा) यांनी केले.

No comments