adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ‘स्वीकृत’ नगरसेवक पदाचा वाद सोशल मीडियावर..शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदमांची थेट पोलिसांत तक्रार

 अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ‘स्वीकृत’ नगरसेवक पदाचा वाद सोशल मीडियावर..शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदमांची थेट पोलिसांत तक्रार   सचिन मोकळं अह...

 अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ‘स्वीकृत’ नगरसेवक पदाचा वाद सोशल मीडियावर..शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदमांची थेट पोलिसांत तक्रार  


सचिन मोकळं अहिल्यानगर

 (संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-  महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी कथित अर्थकारण केल्याच्या आरोपांमुळे सोशल मीडियावर शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.या आरोपांवरून शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत थेट कारवाईचा मार्ग अवलंबला आहे.

माझी प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने खोटा व बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा आरोप करत कदम यांनी ही तक्रार दिली.पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान,स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी दरम्यान शिवसेनेकडून आदेश जाधव यांचे नाव देण्यात आले होते.मात्र अर्धवट कागदपत्रांमुळे त्यांचा अर्ज रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक ग्राफिक इमेज व्हायरल झाली असून त्यात संभाजी कदम यांचा फोटो वापरून गंभीर आरोप करण्यात आले होते.

या प्रकरणामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.सोशल मीडियावरील पोस्टमुळे राजकीय वातावरण तापले असून,आता या प्रकरणात पुढे कोणते नवे खुलासे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments