चोपडा आगारात मराठी भाषा दिन उत्साहात; कवी रमेश जे. पाटील यांचा सत्कार चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- आगार व्यवस्थाप...
चोपडा आगारात मराठी भाषा दिन उत्साहात; कवी रमेश जे. पाटील यांचा सत्कार
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- आगार व्यवस्थापक कार्यालयात दिनांक २७ रोजी सकाळी सुमारे दहा वाजता मराठी भाषा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी अभिजात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आयुष्य अर्पण करणारे ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ कवी रमेश जे. पाटील यांचे स्वागत व सत्कार आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक सिद्धार्थ चंदनकर, लेखाकर ईश्वर चौधरी, स्थानक प्रमुख सागर सावंत, वाहतूक निरीक्षक नितीन सोनवणे, वाहन परीक्षक भगवान नायदे, लिपिक रीना पाटील, सविता मनोज कोळी, वाहतूक नियंत्रक चंद्रभान रायसिंग, शिपाई निर्मला सोनवणे तसेच इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, साहित्यिक कवी रमेश पाटील यांना तात्यासाहेबांच्या सहवासात काही क्षण घालवण्याचा लाभ मिळाला होता. त्यांच्या त्या आठवणींना उजाळा देताना मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भगवान नायदे यांनी मानले. एकूणच मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम उत्साहात व अभिमानाच्या वातावरणात पार पडला.

No comments