adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा नगरपरिषदेचा दणका! ३० गाळ्यांना सील, ८० मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन कट — ९ लाखांची तात्काळ वसुली; ७ दिवसांत थकबाकी भरा अन्यथा कठोर कारवाई

 🔴 चोपडा नगरपरिषदेचा दणका! ३० गाळ्यांना सील, ८० मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन कट — ९ लाखांची तात्काळ वसुली; ७ दिवसांत थकबाकी भरा अन्यथा कठोर ...

 🔴 चोपडा नगरपरिषदेचा दणका!

३० गाळ्यांना सील, ८० मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन कट — ९ लाखांची तात्काळ वसुली; ७ दिवसांत थकबाकी भरा अन्यथा कठोर कारवाई  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज सकाळी सहा वाजेपासून चोपडा नगरपरिषदेने थकीत कर व गाळे भाडेधारकांवर मोठी कारवाई सुरू केली. महाराणा प्रताप, आंबेडक समाज मंदिर, राजीव गांधी, महात्मा गांधी, आठवडे बाजार ए, बी, सी व डी या नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्समधील कर व भाडे थकीत असलेल्या गाळ्यांवर सील लावण्यात आले. आजच्या कारवाईत सुमारे ३० नगरपरिषदेच्या गाळ्यांना सील ठोकण्यात आले.

यानंतर कारवाईचा दुसरा टप्पा राबवित गौतम नगर, मल्हारपुरा, चिंच चौक आदी भागातील सुमारे ८० थकीत मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन तात्काळ बंद करण्यात आले.

या कठोर कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून आजच सुमारे ९ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे.

📞 फोनचा पाऊस, मुदतीची मागणी

दहा वाजेनंतर नळ कनेक्शन बंद झालेल्या व गाळ्यांना सील लागलेल्या थकबाकीदारांनी नगरपरिषदेकडे धाव घेत घरपट्टी, पाणीपट्टी व दुकान भाडे भरण्यासाठी गर्दी केली. काहींनी मुख्याधिकारी, लोकप्रतिनिधी, कर निरीक्षक व वसुली कारकून यांना फोन करून मोहीम थांबविण्याची तसेच काही दिवसांची मुदत देण्याची विनंती केली.

⚠️ सात दिवसांची अंतिम मुदत

नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरातील सर्व नागरिकांनी थकित मालमत्ता कर, नळपट्टी व दुकान भाडे येत्या सात दिवसांत भरावे. अन्यथा पुढील कठोर कारवाई अटळ आहे.

🚨 पुढील कारवाई अधिक कठोर

थकबाकीदारांविरुद्ध खालील उपाययोजना पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत –

घरासमोर वाजंत्री वाजविणे

सामानाची जप्ती

वर्तमानपत्रात नाव प्रसिद्ध करणे

मालमत्तेवर बोजा बसविणे

चौकाचौकात बॅनरवर थकबाकीदार म्हणून नाव जाहीर करणे

रिक्षावर माईकद्वारे नाव जाहीर करणे

नळ कनेक्शन बंद करणे

दुकानांना सील लावणे

💰 सात कोटींची थकबाकी

सध्या नगरपरिषदेची तब्बल ७ कोटी रुपयांची थकबाकी बाकी असून शहरातील विकासकामांसाठी निधी उभारणी आवश्यक आहे. प्रशासनाने ही मोहीम जनजागृती व शिस्त निर्माण करण्यासाठी सुरू केली असून नागरिकांनी स्वखुशीने नगरपरिषदेत येऊन थकबाकी भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. चोपडा शहरात या कारवाईमुळे प्रचंड चर्चा रंगली असून थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, “कर भरणाऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून ही मोहीम कठोरपणे राबविण्यात येत आहे.”

No comments