चोपडा आगारा तर्फे"एस टी सह तीर्थाटन" सहल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- महारा...
चोपडा आगारा तर्फे"एस टी सह तीर्थाटन" सहल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- महाराष्ट्र राज्याचे परीवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून सर्व सामान्य नागरिकांना स्वस्तात परवडेल व सुरक्षित देवदर्शन घडेल तसेच तिर्थक्षेत्रांची माहीती व्हावी यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे -"एस टी सह तीर्थाटन"सहल योजना राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेत(सहलीत) महाराष्ट्रातील सर्व धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळे तसेच तिर्थक्षेत्रांसाठी हि योजना लागु असुन महीला सन्मान, जेष्ठ नागरिक ५० टक्के सवलत, अमृत जेष्ठ नागरिकांना साठी मोफत या सर्व सवलती लागु असतील. सदर सवलतीसाठी गावातुन किंवा शहरातुन ४० प्रवाश्यांचा गट तयार झाल्यास त्यांना एस टी ची नविन अद्यावत बस उपलब्ध करून देण्यात येईल. तरी नागरीकांनी एस टी सह तीर्थाटन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन चोपडा आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी केले आहे.


No comments