adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला ‘एनईपी–२०२० अंमलबजावणीतील अग्रणी’ राष्ट्रीय पुरस्कार

 पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला ‘एनईपी–२०२० अंमलबजावणीतील अग्रणी’ राष्ट्रीय पुरस्कार चोपडा प्रतिनिधी:  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा येथील ...

 पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला ‘एनईपी–२०२० अंमलबजावणीतील अग्रणी’ राष्ट्रीय पुरस्कार


चोपडा प्रतिनिधी: 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा येथील सी.बी.एस.ई. बोर्डाशी संलग्न असलेल्या पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला CED फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा ‘NEP–2020 अंमलबजावणीतील अग्रणी’ पंचतारांकित पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्ली येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण समारंभात भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या NIOS चे उपसंचालक आलोक कुमार गुप्ता, नोएडा फिल्म सिटीचे संस्थापक डॉ. संदीप मारवा तसेच  प्रियदर्शी नायक यांच्या हस्ते पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधी सौ. दिपाली पंकज बोरोले व शाळेचे प्राचार्य मिलिंद पाटील यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.

या पुरस्काराचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे देशभरातील सुमारे २९ हजार सीबीएसई शाळांमधून शेकडो शाळांची काटेकोर निवड प्रक्रिया पार पाडून पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलची निवड करण्यात आली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP–2020) ची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी, विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती तसेच नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांमुळे शाळेने राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शाळेत आधुनिक शिक्षणाची सांगड घालत AI Learning (कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण), अत्याधुनिक Space Lab व Robotics Lab यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि तांत्रिक कौशल्यांचा विकास करण्यात येत आहे. भविष्यातील शिक्षणाच्या गरजा ओळखून राबविण्यात येणारे हे उपक्रम एनईपी–२०२० च्या उद्दिष्टांशी पूर्णतः सुसंगत आहेत.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले, संस्थेचे अध्यक्ष पंकज बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक नारायण बोरोले, गोकुळ भोळे, प्राचार्य मिलिंद पाटील तसेच संपूर्ण शिक्षकवृंदाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. या राष्ट्रीय पुरस्कारामुळे शाळेने राज्य व राष्ट्रीय पातळीवर केलेल्या उज्ज्वल कार्याची दखल घेण्यात आली असून पालकवर्ग व शिक्षण क्षेत्रातून शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments