adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गणपूर येथे सर्वपक्षीयांतर्फे अजित पवार यांना श्रद्धांजली

गणपूर येथे सर्वपक्षीयांतर्फे अजित पवार यांना श्रद्धांजली विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  गणपूर (ता चोपडा):-  राज्याचे उपमुख...

गणपूर येथे सर्वपक्षीयांतर्फे अजित पवार यांना श्रद्धांजली


विश्राम तेले चौगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 गणपूर (ता चोपडा):-  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना येथे सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. ग्रामपंचायत चौकात झालेल्या कार्यक्रमात अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार प्रा दिलीपराव सोनवणे, शांताराम पाटील, यांनी अभिवादन केले. यावेळी तालुकास्तरावरील विविध पक्षांचे व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना महाराष्ट्रावर पकड असलेला लोकाभिमुख आणि तळागाळातील जनता, शेतकरी यांच्यासाठी झटणारा आणि राज्याची खडान खडा माहिती असलेला एक परखड नेता आज महाराष्ट्राने गमावलेला आहे. आणि ती उणीव भरून काढणे कठीण असल्याचे मत मांडले. यावेळी सुनील पाटील, कांतीलाल पाटील, शांताराम पाटील, संजीव सोनवणे,माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे यांनी अजित पवार यांच्या आठवाश्रद्धांजलीपर विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.बाळकृष्ण पाटील यांनी केले. डॉ अजय करंदीकर व बाळकृष्ण दीक्षित यांनी पसायदान व मंत्रोपचारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी भरत पाटील,बाळासाहेब पाटील,भरत बाविस्कर,ऍड एस डी सोनवणे,शशिकांत देवरे,डी पी साळुंखे,नरेंद्र पाटील,प्रमोद पाटील,शशिकांत पाटील, नारायण पाटील, संभाजी पाटील,गोपाल महाजन,नीता पाटील,ए के गंभीर व तालुकास्तरीय विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.हर्षल पाटील,नरेंद्र कोळी,आदींनी परिश्रम घेतले......गणपूर(ता चोपडा) स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या शोकसभेत बोलतांना अरूणभाई गुजराथी

No comments