रावेर पोलिसांनी २४ तासातच लावला चोरीचा छडा मुद्देमालासह आरोपींना अटक रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर पोल...
रावेर पोलिसांनी २४ तासातच लावला चोरीचा छडा मुद्देमालासह आरोपींना अटक
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांतच एका जबरी चोरी करणाऱ्या टोळीस अटक करून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई फिर्यादी गोवर्धनदास सफरमल कोटवाणी यांच्या तक्रारीवरून करण्यात आली. दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ८.४५ वाजता गोवर्धनदास कोटवाणी विवरे बु. गाव येथील किराणा दुकानातून ग्राहकांकडून उधारीचे पैसे गोळा करून रावेरकडे येत होते. त्यावेळी एका अनोळखी मोटारसायकल चालकाने त्यांना थांबवून 'माझ्यासोबत चला' असे सांगितले आणि फिर्यादींच्या मोटारसायकलवर बसवून रावेरकडे नेले. पारश्या नाल्याजवळ मोटारसायकल थांबवली आणि दोघे अन्य अनोळखी इसम समोर आले. त्यांनी धमकी देऊन फिर्यादींच्या खिश्यातील १५ हजार रुपये रोख जबरदस्तीने काढले आणि पळ काढला.
ही घटना रावेर पोलीस स्टेशनला कळताच, भारतीय दंड संहिता कलम ३०४ नुसार दि.१९ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप व पो.नि. डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक सुनिल मोरे यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपासात मोहम्मद उबेद मोहम्मद एजाज (रा. नागझिरी चौक, रावेर), शेख मोईन शेख नईम (रा. विवरे बु., रावेर) आणि रेहानखान जावेद खान (रा. विवरे बु., रावेर)
यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून चोरीस गेलेले १५ हजार रुपये रोख आणि ३५ हजार रुपये किंमतीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल क्र. (एम.एच.०२-सीएन-५३७६) जप्त करण्यात आली. यांनी केली कारवाई पोना कल्पेश + मुरलीधर आमोदकर, पोकाँ सुकेश शब्बीर तडवी, पोका प्रमोद सुभाष पाटील, पो का विशाल शिवाजी पाटील, पोकों विकार गयासोद्दीन शेख, पोका संभाजी विजागरे, पोकाँ श्रीकांत शिरीष चव्हाण आणि पोकाँ गजानन लक्ष्मण बोने यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोउपनिरीक्षक सुनिल मोरे करीत आहेत.

No comments