जे.ई.स्कूल मुक्ताईनगर येथे हरित सेनेअंतर्गत वृक्षारोपण व स्वच्छता अभियान प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ता...
जे.ई.स्कूल मुक्ताईनगर येथे हरित सेनेअंतर्गत वृक्षारोपण व स्वच्छता अभियान
प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर:– येथील जे.ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे सामाजिक वनीकरण विभाग, मुक्ताईनगर यांच्या वतीने हरित सेनेअंतर्गत विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या या कार्यक्रमात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
कार्यक्रमास वनपरिक्षेत्र अधिकारी मा. अजय शिंदे, वनपाल विजय बोराडे, सुनील पवार (भुसावळ), वनरक्षक राम असुरे (मुक्ताईनगर), वनरक्षक मयूर पाटील (भुसावळ) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी, उपप्राचार्या व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक व्ही. डी. ब-हाटे, के. आर. कवळे, हरित सेनाप्रमुख एस. बी. वंजारी, क्रीडा शिक्षक एस. जे. मोरे, एस. एन. भोळे व हरित सेना युनिटचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी अजय शिंदे व प्राचार्य व्ही. एम. चौधरी यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच Sant Gadge Baba यांच्या जयंतीनिमित्त हरित सेना युनिटच्या विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश दिला.
सामाजिक वनीकरण विभागामार्फत विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य व्ही. एम. चौधरी यांनी “एक पेड माँ के नाम” या उपक्रमाची सविस्तर माहिती देत वृक्षसंवर्धन व पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. अधिकाधिक वृक्षलागवड करून समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या उपक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभाग, मुक्ताईनगर तसेच शाळेचे कर्मचारी सुरज कोळी, अभिषेक बोदडे, राहुल राठोड, राम पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन हरित सेनाप्रमुख एस. बी. वंजारी यांनी केले.

No comments