adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

इंदौर–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर अंडरपासच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम; तहसीलदारांचे लेखी आश्वासन

 इंदौर–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर अंडरपासच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम; तहसीलदारांचे लेखी आश्वासन   किरण धायले मुक्ताईनगर...

 इंदौर–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर अंडरपासच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम; तहसीलदारांचे लेखी आश्वासन  


किरण धायले मुक्ताईनगर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड) 

इंदौर–छत्रपती संभाजीनगर 753-एल राष्ट्रीय महामार्गावर मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्रीभोजना व लोहारखेडा शिवारातील उमरदा फाटा येथे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी अंडरपास देण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. या आंदोलनाचे नेतृत्व ऍड. पवनराजे पाटील यांनी केले. त्यांच्या सोबत जीवन पाटील, विशाल पाटील, रवि सुरवाडे, दशरथ कोडे, वासुदेव पाटील, रोशन पाटील, दीपक पाटील, दीपक पानपाटील तसेच लोहारखेडा, पिंप्रीभोजना व परिसरातील असंख्य शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करत जवळपास तीन तास रस्ता रोखून धरला. यामुळे सुमारे ५ ते ६ किलोमीटर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक पूर्णतः ठप्प झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी मुक्ताईनगरचे तहसीलदार वखारे साहेब, सर्कल अधिकारी मुंडे साहेब तसेच ए.पी.आय. चाटे साहेब आंदोलनस्थळी उपस्थित झाले. यावेळी तहसीलदार वखारे साहेब यांनी शेतकऱ्यांची मागणी मान्य करण्यात आली असून लवकरच अंडरपासच्या कामास सुरुवात करण्यात येईल, असे लेखी आश्वासन आंदोलनस्थळी दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

No comments