फैजपूर पंचक्रोशी भाविकांतर्फे वारकरी शिक्षण संस्थेस सात लाखाचा दिला अन्नदान निधी मदतीचा ओघ सुरू ठेवणार ; नरेंद्रभाऊ नारखेडे इदू पिंजारी ...
फैजपूर पंचक्रोशी भाविकांतर्फे वारकरी शिक्षण संस्थेस सात लाखाचा दिला अन्नदान निधी मदतीचा ओघ सुरू ठेवणार ; नरेंद्रभाऊ नारखेडे
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील पंचक्रोशीतील भाविकांचे वतीने आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेस सुमारे सात लाख रुपये अन्नदान निधी संस्थेचे जेष्ठ संत शांती ब्रम्ह मारोती महाराज कुरेकर व अध्यक्ष संदीपन महाराज शिंदे यांचेकडे डिंगम्बर महाराज चिनावलकर मठ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांचे हस्ते देण्यात आला जोग महाराज पुण्यतिथी उत्सव प्रसंगी आज वारकरी संप्रदायाचे सकळ महाराष्ट्र तुन हजारो संत उपस्थित होते यावेळी उपस्थित संत यांनी नरेंद्र नारखेडे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला हा मदतीचा ओघ यापुढेही सुरू राहील अशी माहिती नरेंद्र नारखेडे यांनी दिली संत विचार कीर्तनाचे माध्यमातून समाज जागृतीचे कार्य करणारे कीर्तनकार घडविण्याचे महान कार्य श्री क्षेत्र आळंदी येथे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था करीत आहे या संस्थेने विद्यार्थ्यांना फी नाही व शिक्षकाला पगार नाही या निस्वार्थ तत्वाने सुमारे एकशे सात वर्षेपासून हे कार्य अखंडपणे सुरू आहे सद्यस्थितीत संस्थेस 600 विद्यार्थी मुख्यत्वे गरीब व निराधारआहे यांना दररोजच्या भोजनाची व्यवस्था करीता स्थिर अन्नदान निधी उभारण्यात येत आहे या अन्नदान निधी साठी फैजपूर व परिसरातील गावातून सुमारे सात लाख निधी जमा करण्याचे काम श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञा समिती व नथुसिंग बाबा राजपूत दौरा मंडळाने केले हा निधी आज आळंदी येथे सुरू असलेल्या जोग महाराज पुण्यतिथी महोत्सवात हा निधी अर्पण करण्यात आला यावेळी विषवस्थ अनिलमहाराज बार्शीकर यांनी प्रास्ताविक केले सचिव बाजीराव नाना चंदिले तुकाराम महाराज मुळीक ज्ञानेश्वर माऊली शिंदे पांडुरंग महाराज घुले पंढरीनाथ आरु परमेश्वर जायभाये रामराव महाराज ढोक मुखेकर शास्त्री नलावडे राजे महाराज कन्हेया महाराज राजपूत संजय राजपूत हेमराज महाराज नरहरी महाराज चौधरी पोपट महाराज कासारखेडेकर उल्हास बाबा सूर्यवंशी संदीप येवले गोविंद महाराज वरसाडे कर सह वारकरी संप्रदायाचे साधक व विद्यार्थी उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

No comments