थोरगव्हाण ग्रामपंचायत कार्यालयाचे आ. प्रा. आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) या...
थोरगव्हाण ग्रामपंचायत कार्यालयाचे आ. प्रा. आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : येथून जवळ असलेल्या थोरगव्हाण (ता. यावल) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आ. प्रा. आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते २१ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले.
थोरगव्हाण गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. मनीषा सोनवणे यांच्या पाठपुराव्यामुळे माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या निधीतून ग्रामपंचायत कार्यालय मंजूर झाले होते. या नव्या इमारतीमुळे ग्रामस्थांना प्रशासकीय कामांसाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार आहेत.
यावेळी ज्येष्ठ नागरिक मुरलीधर चौधरी, माजी उपसरपंच समाधान सोनवणे, उपसरपंच बाळू पाटील, ग्रामपंचायत सदस्य सूर्यभान पाटील, बाळू शिंपी, अनिल भालेराव तसेच आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना आ. प्रा. आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांनी थोरगव्हाण गावातील विकासकामांचे कौतुक केले व गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
दरम्यान, त्यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या सुमारे १ कोटी १० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व शुभारंभ याच दिवशी करण्यात आले. यामध्ये कोळन्हावी, कीनगाव खुर्द, मनवेल येथे प्रत्येकी १० लाख रुपयांचे स्मशानभूमी सांत्वन शेड; शिरसाड, थोरगव्हाण व शिरागड येथे नवीन स्मशानभूमी बांधकाम; तसेच बोराडे व शिरसाड येथे सांत्वन शेड आदी कामांचा समावेश आहे.
संध्याकाळी थोरगव्हाण व शिरसाड येथे बौद्ध विहाराचे लोकार्पणही करण्यात आले. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी, संचालक सूर्यभान पाटील, प्रमोद सोनवणे, रामकृष्ण सोळंके, सुधाकर दगडू कोळी, राघोभाऊ कोळी, प्रताप सोनवणे, भरत चौधरी तसेच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments