दृष्टीहिन विजय बेलवलकर यांना सामाजिक कार्यकर्ती रूचिताताई नाईक यांचा मदतीचा हात.... मनिषा जाधव वसई विरार (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नाला...
दृष्टीहिन विजय बेलवलकर यांना सामाजिक कार्यकर्ती रूचिताताई नाईक यांचा मदतीचा हात....
मनिषा जाधव वसई विरार
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नालासोपारा ता, २१ :- आपण समाजामध्ये अनेक दिव्यांग व्यक्ती पाहतो. अंध, मूकबधीर, हात किंवा पायाने अधू असलेला अनेक व्यक्ती समाजात आजूबाजूला वावरताना दिसतात. त्यांचं जगणं सर्वसामान्यांसारखं नसतं. अपंगत्वावर मात करुन त्यांना समाजात राहायचं असत नालासोपारातील दृष्टीहीन दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले विजय बेलवलकर यांना उपजिवीकेसाठी स्टॉल व दिव्यांग पेन्शन करिता दिव्यांग प्रमाणपत्राची नितांत गरज होती अनेक वर्ष प्रयत्न करून हि दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यास अडचण येत होती. याबाबत सामाजिक कार्यकर्ती रूचिताताई नाईक यांना सांगताच अंध विजय बेलवलकर यांना मोफत दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अडचणीच्या वेळी केलेल्या मदतीचे समाजातुन कौतुक होत आहे. ही मदत नक्कीच सर्वांना प्रेरणा देणारी आहे.
दिव्यांग व्यक्तींना दररोज विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
दिव्यांग नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत मिळणाऱ्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष केले जातं. असं असताना दिव्यांग बांधवांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहुन त्यांना मोफत रूग्णवाहिका, मोफत दिव्यांग प्रमाणपत्र, दिव्यांग पेन्शन, साहित्य वाटप करून
दिव्यांगानाही सक्षम करून त्या मुख्यजजग प्रवाहात आणण्यासाठी मदत करत असल्याचे रूचिताताई नाईक यांनी आपली भावना व्यक्त केली.

No comments