adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोबाईलवरील ‘लुडो’च्या वादातून हाणामारी; दाताळा येथे परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

  मोबाईलवरील ‘लुडो’च्या वादातून हाणामारी; दाताळा येथे परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर...

 मोबाईलवरील ‘लुडो’च्या वादातून हाणामारी; दाताळा येथे परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर:-  मोबाईलवर ‘लुडो’ हा खेळ खेळताना मध्ये बोलल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांत वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील दाताळा येथील इंदिरानगर परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाताळा येथील रहिवासी गजानन लक्ष्मण सावळे (वय ४२) हे २३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता मित्रांसह मोबाईलवर लुडो खेळत होते. त्यावेळी तेथे आलेल्या समीर शहा जाबीर शहा यांनी खेळादरम्यान हस्तक्षेप केल्याने शाब्दिक वाद निर्माण झाला. “तू मध्ये का बोलतोस?” असे विचारल्यावर समीर शहा यांनी छाती, तोंड व कपाळावर चापटी-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप सावळे यांनी तक्रारीत केला आहे. तसेच आसीफ शहा मन्सूर शहा यांनीही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी समीर शहा व आसीफ शहा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ (२), ३५१ (२)(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, समीर शहा (वय २२) यांनी दिलेल्या प्रति-तक्रारीनुसार, ते लुडोचा खेळ पाहत उभे असताना काही बोलल्यामुळे गजानन सावळे यांनी त्यांच्या डाव्या गालावर चापट मारून गचांडी धरत शिवीगाळ केली. तसेच ईश्वर मुरलीधर सुरळकर व निखिल अंबादास खराटे यांनीही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या तक्रारीवरून पोलिसांनी गजानन सावळे, ईश्वर सुरळकर व निखिल खराटे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ (२), ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार बाळू टाकरखेडे करीत आहेत.

No comments