adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रोहीणखेड येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

 रोहीणखेड येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर:-   बु...

 रोहीणखेड येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर:-   बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रोहीणखेड येथे भरवस्तीतून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहीणखेड (ता. मोताळा) येथील रहिवासी दिलीप सावळे यांची मुलगी श्रुतीका दिलीप सावळे (वय १७) ही २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता घरातून शेजारी राहणारे नातेवाईक पुंडलीक सावळे यांच्याकडे जेवणासाठी जात असल्याचे सांगून बाहेर पडली. घर शेजारीच असल्याने कुटुंबीयांनी तिला पाठवले. मात्र काही वेळानंतर पुंडलीक सावळे यांच्या पत्नी ज्योतीबाई सावळे यांनी श्रुतीका जेवणासाठी आली नसल्याचे सांगितल्याने कुटुंबीयांना धक्का बसला.

घरातून निघून गेलेली मुलगी नातेवाईकांकडे पोहोचली नसल्याचे लक्षात येताच दिलीप सावळे व कुटुंबीयांनी संपूर्ण गावात शोधाशोध केली. नातेवाईक, मित्र-मैत्रिणींकडे चौकशी करण्यात आली; मात्र श्रुतीकाचा कुठलाही ठावठिकाणा लागला नाही. या घटनेनंतर रोहीणखेड गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

हताश झालेल्या दिलीप सावळे यांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी गजानन पाटील करीत असून मुलीच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच मुलीचा शोध घेऊन तिला सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

No comments