संत महापुरुषांचे विचार आत्मसात करा _अनिल पाटील विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लासुर ता चोपडा येथे संत शिरोमणी रविदास मह...
संत महापुरुषांचे विचार आत्मसात करा _अनिल पाटील
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लासुर ता चोपडा येथे संत शिरोमणी रविदास महाराजांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किसान विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल हिम्मतराव पाटील यांनी स्पष्ट केले की संत महापुरुषांचे विचार आत्मसात केले तर जिवन सुसंकृत होते. महापुरुषांचे विचार अंगीकारल्यानंतर पुढील पिढी विचारशील बनते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच नर्मदाबाई भील यांनी केले. संत रविदास यांची आरती सामूहिक पद्धतीने म्हटली गेली. कार्यक्रमास चोपडा सुत गिरणीचे संचालक अमृतराव वाघ, माळी समाजाचे राज्याध्यक्ष प्रा ए के गंभीर, शेतकी संघाचे संचालक नारायण पाटील, विकास सोसायटी माजी चेअरमन चंद्रकांत पाटील, गोरख पाटील विकास वाघ, भिकन माळी, ह भ प बापू महाराज,सोनू लखा वाघ, सुकदेव मोतीराले, सुभाष वाघ, जितेंद्र महाजन, नारायण बागुल, दिनेश बागुल,संजय वाघ, दिनेश अहिरे , वासुदेव महाजन, नाटु महाजन हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक बागुल यांनी केले सूत्रसंचालन देवीलाल बाविस्कर सर यांनी तर आभार सुभाष वाघ यांनी मानले.

No comments