adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चैन स्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश..रेकॉर्डवरील आरोपी LCB च्या ताब्यात..तब्बल ७ गुन्हे उघड

 चैन स्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश..रेकॉर्डवरील आरोपी LCB च्या ताब्यात..तब्बल ७ गुन्हे उघड  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अह...

 चैन स्नॅचिंग टोळीचा पर्दाफाश..रेकॉर्डवरील आरोपी LCB च्या ताब्यात..तब्बल ७ गुन्हे उघड 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-शिर्डी येथे चैनस्नॅचिंग करणारा रेकॉर्डवरील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन आरोपी कडुन 2,50,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून 7 चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघड करण्याची कामगिरी केली आहे.बातमीची हकीगत अशी की,फिर्यादी नविनकुमार निंगारेड्डी कोनारेड्डी (रा. शांतीनिकेतननगर,पो.साधन, केरी धारवाड,जि.धारवाड) हे त्यांचे कुटुंबासह शिर्डी येथे दर्शनाकरीता आले होते.दि. 15/01/2026 रोजी पहाटेच्या सुमारास फिर्यादी हे त्यांचे पत्नीसह साईबाबा मंदीर शिर्डी येथे दर्शन करुन बाहेर आले असता हॉटैल अलौकिक परिसरामध्ये मोटारसायकल वरील दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीचे आईचे गळ्यातील 5,60,000/- रुपये.किमतीचे दागिने त्यामध्ये सोन्याच्या 02 चैन व एक मंगळसुत्र असे 112 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावुन घेवुन गेलेले आहेत.सदर घटने बाबत शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 36/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309 (4), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सदर गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केलेले आहे.सदर आदेशानुसार पोनि.श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली वरील गुन्हा उघडकीस आणणेकामी पोउपनि/दिपक मेढे,पोलीस अंमलदार राहुल द्वारके,रोहित येमुल,सुनिल मालणकर, बाळासाहेब गुंजाळ,प्रशांत राठोड,महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना व मार्गदर्शन करुन सदरचे पथक रवाना करण्यात आले होते.

वरील पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देवुन,अशा प्रकारे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपींची माहिती संकलित करुन आरोपींची माहिती काढत असतांना पथकास व्यवसायीक कौशल्य व गुप्त बातमीदारामाचे मार्फत सदरचा गुन्हा हा रेकार्डवरील आरोपी नामे विकास चव्हाण रा.अशोकनगर,ता. श्रीरामपुर व त्याचे साथीदाराने केला असल्याची माहिती मिळाली.सदर आरोपीचा शोध घेत असतांना

विकास उर्फ राहुल गोडाजी चव्हाण वय - 40 वर्षे, रा. रेल्वे गेटजवळ, अशोकनगर, श्रीरामपुर, ता. श्रीरामपुर हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार नामे गणेश विजय चव्हाण रा.श्रीरामपुर ते अशोकनगर जाणारे रोड, मोहटादेवी मंदीराजवळ, श्रीरामपुर (फरार) याचेसह केला असल्याची तसेच गुन्ह्यातील काही मुद्देमाल हा

राखी गणेश चव्हाण रा. श्रीरामपुर ते अशोकनगर जाणारे रोड, मोहटादेवी मंदीराजवळ, श्रीरामपुर (फरार) हिचे मार्फतीने विकला असल्याची कबुली दिली आहे.गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत आरोपीकडे तपास करता त्याचे ताब्यातुन 1,00,000/- रुपये किमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, गुन्ह्याचे वेळी वापरलेली 1,50,000/- रुपये किमतीची यामाहा कंपनीची मोटारसायकल एम.एच. 17 डी. एच. 2414 असा एकुण 2,50,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ताब्यातील आरोपीने अशाप्रकारचे आणखी इतर गुन्हे केले आहेत काय याबाबत तपास करता आरोपीकडुन खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.आरोपीकडुन उघडकीस आलेले गुन्हे :

शिर्डी, अहिल्यानगर – गु.र.नं. 36/2026

शिर्डी, अहिल्यानगर – गु.र.नं. 35/2025

शिर्डी, अहिल्यानगर – गु.र.नं. 1033/2025

शिर्डी, अहिल्यानगर – गु.र.नं. 1011/2025

राहाता, अहिल्यानगर – गु.र.नं. 436/2025

संगमनेर तालुका, अहिल्यानगर – गु.र.नं. 24/2026

सिन्नर, नाशिक – गु.र.नं. 33/2026

आरोपी नामे विकास उर्फ राहुल गोडाजी चव्हाण हा रेकार्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये व तामिळनाडु राज्यामध्ये दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीस पिरकनकरानाई, तामिळनाडु येथील गु.र.नं. 800/2009 भादवि कलम 395 मध्ये शिक्षा झालेली असुन सन 2009 ते सन 2016 या कालावधीमध्ये त्याने शिक्षा भोगलेली आहे. ताब्यातील आरोपीस पुढील तपासकामी शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.

No comments