adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेगावात 'प्रकट दिना'निमित्त नवदुर्गा भजन मंडळाची दिंडी उत्साहात संपन्न

  शेगावात 'प्रकट दिना'निमित्त नवदुर्गा भजन मंडळाची दिंडी उत्साहात संपन्न   अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शेगाव:...

 शेगावात 'प्रकट दिना'निमित्त नवदुर्गा भजन मंडळाची दिंडी उत्साहात संपन्न  



अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शेगाव:-  संत नगरी शेगाव येथील केशव नगर भागातून, श्री गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून नवदुर्गा भजन मंडळाच्या वतीने भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या दिंडीचे हे तिसरे वर्ष असून, अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तीमय वातावरणात हा सोहळा पार पडला.प्रमुख उपस्थिती आणि नेतृत्व

 दिंडीचे नेतृत्व मंडळाच्या अध्यक्ष सौ. दुर्गा ज्ञानेश्वर महाले यांनी केले.पालखी पूजन: पालखीचे पूजन सौ. लीलाबाई मधुकर धुमाळ यांच्या हस्ते भक्तीभावाने करण्यात आले.सहभाग: या दिंडीमध्ये मंडळातील २० महिलांसह पुरुष आणि बाल गोपाळांचा मोठा सहभाग होता.ही दिंडी संत गजानन महाराज मंदिर ते विसावा पर्यंत काढण्यात आली. 'गण गण गणात बोते'च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दिंडीमध्ये महिलांनी भजने सादर केली, तर बालगोपाळांच्या उत्साहाने दिंडीची शोभा वाढवली.दिंडीमध्ये सौ.चेतना खेते, अर्चना मल,सरिता राठी,अनिता जेठवा, सविता मन,ज्योती मेटांगे,संगीता मेटांगे,गंगा टाले, वनमाला सांगोळे,शारदा मेटांगे,अनुराधा पाचपोर,उर्मिला मसने,जोशी ताई,शारदा लांजुळकर,मीनाक्षी लांजुळकर,वैष्णवी मेटांगे आणि रजनी मल यांचा सक्रिय सहभाग होता.तसेच बालगोपाल आदित्य महाले, विनाधारी मयूर महाले, सर्वेश मल आणि विराज बयास यांनीही दिंडीत सहभाग नोंदवला.दिंडीच्या यशस्वीतेसाठी मनोहर पाचपोर, कमलाकर टोंगळे, सुरेश जेठवा यांनी पालखी सजावटीचे काम पाहिले. तसेच, संपूर्ण दिंडीचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी श्री. ज्ञानेश्वर महाले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




No comments