adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर जे.टी.महाजन पॉलिटेक्निक येथे ‘महिंद्रा प्राईड क्लासरूम’ प्रशिक्षणाचा समारोप

 फैजपूर जे.टी.महाजन पॉलिटेक्निक येथे ‘महिंद्रा प्राईड क्लासरूम’ प्रशिक्षणाचा समारोप  इदू पिंजारी फैजपूर  संपादक हेमकांत गायकवाड  फैजपूर येथी...

 फैजपूर जे.टी.महाजन पॉलिटेक्निक येथे ‘महिंद्रा प्राईड क्लासरूम’ प्रशिक्षणाचा समारोप 


इदू पिंजारी फैजपूर 

संपादक हेमकांत गायकवाड 

फैजपूर येथील जे. टी. महाजन पॉलिटेक्निकमध्ये नांदी फाउंडेशन व महिंद्रा प्राईड क्लासरूम यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी रोजगारक्षमता व व्यक्तिमत्व विकासावर आधारित विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा तीन दिवसीय प्रशिक्षण उपक्रम ३ ते ५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडला. या कालावधीत एकूण ९ सत्रांद्वारे १८ तासांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामध्ये बॉडी लँग्वेज, प्रोफेशनल ग्रूमिंग, इंग्लिश फॉर करिअर, इंटरव्ह्यू तयारी, ग्रुप डिस्कशन तसेच प्रोफेशनल एथिक्स यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश होता. कार्यक्रमाला पॉलिटेक्निकमधील सर्व विभागप्रमुख व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या रोजगारक्षमतेत निश्चितच वाढ होईल आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यास चालना मिळेल, असे मत प्राचार्य पी. एम. राणे यांनी व्यक्त केले. समारोपप्रसंगी प्राचार्य मा. पी. एम. राणे यांनी प्रशिक्षक रोहित ओमप्रकाश शिरसाट यांचे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल आभार मानले.

No comments