adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सीसीटीव्ही निगराणीमुळे कॉपीमुक्त अभियानाला बळ; प्रशासनाच्या भेटींनी समाधान ▪️तालुक्यात बारावीच्या परीक्षा शांततेत व सुरळीत एपीआय संतोष पवार यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त

 सीसीटीव्ही निगराणीमुळे कॉपीमुक्त अभियानाला बळ; प्रशासनाच्या भेटींनी समाधान ▪️तालुक्यात बारावीच्या परीक्षा शांततेत व सुरळीत एपीआय  संतोष पवा...

 सीसीटीव्ही निगराणीमुळे कॉपीमुक्त अभियानाला बळ; प्रशासनाच्या भेटींनी समाधान

▪️तालुक्यात बारावीच्या परीक्षा शांततेत व सुरळीत एपीआय  संतोष पवार यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त 


विकास पाटील धरणगाव 

(संपादक -:-  हेमकांत गायकवाड)

धरणगाव : धरणगाव तालुक्यात बारावीच्या परीक्षेला काल शांत, शिस्तबद्ध आणि सुरळीत वातावरणात प्रारंभ झाला. तालुक्यातील तीनही परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत परीक्षा पार पडल्याने कॉपीमुक्त अभियानाला खऱ्या अर्थाने बळ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरात पी. आर. हायस्कूल, इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय तसेच पाळधी येथे भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे परीक्षा केंद्र आहे. धरणगावातील पी. आर. हायस्कूल येथे केंद्र संचालक शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र सैंदाणे तर इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात केंद्र संचालक डब्ल्यू. एम. पठाण, उपकेंद्र संचालक एस. एन. चौधरी हे काम पाहत आहेत. पहिल्याच दिवशी सर्व केंद्रांवर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षा दिली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे परीक्षेची पारदर्शकता वाढली असून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होत असल्याने अभ्यासू विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तर, गैरप्रकारांवर अवलंबून राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचेही दिसून आले. गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी सांगितले की, सीसीटीव्ही निगराणीमुळे कॉपीमुक्त अभियानाला प्रभावी सुरुवात झाली आहे. परीक्षा प्रक्रियेतील शिस्त आणि पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध आहे. पंचायत समिती शिक्षण विभागाकडून सर्व केंद्रांवर बैठे पथक तैनात करण्यात आले असून गटविकास अधिकारी यांच्या पथकानेही केंद्रांना भेट देत व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच नायब तहसीलदार संदीप मोरे यांच्या नेतृत्वात महसूल विभागाच्या पथकाने केंद्रांना भेटी देऊन समाधान व्यक्त केले. परीक्षेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस निरीक्षक सुनील पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. डॉ. भावना भोसले यांनी पुढे नमूद केले की, कॉपी करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच उच्च शिक्षणाच्या टप्प्यावर अडचणी निर्माण होतात. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कॉपीमुक्त परीक्षा होणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षक व पालकांचे मिळत असलेले सहकार्य ही एक सकारात्मक आणि आशादायक सुरुवात आहे. एकूणच, धरणगाव तालुक्यातील परीक्षा प्रक्रियेबाबत प्रशासन, शिक्षण विभाग आणि पोलीस यंत्रणा सजग असल्याचे चित्र असून परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पडत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

No comments