adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रमजान विशेष पवित्र कुराण आणि मानवता

 रमजान विशेष पवित्र कुराण आणि मानवता  मानव ईश्वराची एक महत्त्वपूर्ण निर्मिती आहे, जेव्हा मानव आपल्यावर सोपविण्यात आलेली नैतिक व चारित्रिक जब...

 रमजान विशेष

पवित्र कुराण आणि मानवता 


मानव ईश्वराची एक महत्त्वपूर्ण

निर्मिती आहे, जेव्हा मानव

आपल्यावर सोपविण्यात आलेली नैतिक व चारित्रिक जबाबदारी पार पाडताना व्यवहारिक रूप देतो, तेव्हा

त्यास मानवता असे म्हटले जाते. यामानवतेत प्रेम, दया, न्याय, स्नेह,बंधुत्व, मर्यादा, सभ्यता इत्यादी सर्वबाबी सामविष्ट असतात. पवित्र कुराण ईश्वराकडून (अल्ला)

सर्व मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी पाठविण्यात आलेला ग्रंथ आहे. यात मानवाच्या संपूर्ण जीवनाकरिता

मार्गदर्शन आहे. मानवास जगात

पाठविण्यामागच्या उद्देशाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मृत्यूनंतर काय होईल, याबाबतदेखील मानवास सावध

केले आहे. हा एक उच्चकोटीचा ग्रंथ आहे. कुराणमध्ये अनेक ठिकाणी स्पष्ट शब्दांत या गोष्टीची घोषणा केली

आहे की, कुराण कोणत्याही नवीन धार्मिक समूहाचा संदेश घेऊन जगात आला नाही तर तो लोकांना त्याच मार्गाकडे बोलवित आहे जो सनातन

काळापासून चालत आला आहे.

मानवाने कोणत्याही विशिष्ट जाती,भाषा आणि विविध समुदायाचा उपासक न होता फक्त अल्लाचा उपासक व्हायला हवे. कुरआन म्हणतो सर्वांचा पालनकर्ता एकआहे आणि प्रत्येक व्यक्तीस तिच्या कर्मानुसार फळ मिळते. ईश्वराची

उपासना व सदाचरण हेच मानवाचे कर्तव्य आहे. धर्माच्या बाबतीत कोणतीही जबरदस्ती नाही. (कुरआन२:२५६) प्रेषित मुहम्मद (स) यांनी रक्तपातास कधीही उचित ठरविलेले

नाही. तुमचा धर्म तुमच्यासाठी आणि माझा धर्म माझ्यासाठी (कुरआन १०८:६) निश्चितच ही आयत धार्मिक सहिष्णुतेच्या दृष्टीने प्रशंसनीय आहे.

कुरआननुसार जो मानव समाजाचे कल्याण करतो तो मनुष्य उत्तम आहे. पृथ्वीवर घमेंडपणात चालू नका. तुम्ही पृथ्वीला फाडूही शकत

नाही किंवा (कुरआन १७:३७) गर्व मानवास नैतिक पतनाकडे नेतो. हा दोष मानव समाजाकरिता हानिकारक

आहे. लोकांनी आपल्यापेक्षा इतर लोकांना नीच व हीन समजू नये आणि त्यांच्याशी अमानुष वर्तन करू नये. तरच परस्परिक संबंध व स्नेहसंबंध. सहानुभूतीपूर्ण राहतील.

अब्दुल सरदार पटेल

चोपडा, जि. जळगाव.

मो. 8766747092

No comments