adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बसस्थानकावर वृद्ध महिलेची सोन्याची माळ लंपास;पाच महिला आरोपींना अटक.. कोतवाली पोलिसांची जलद कारवाई

 बसस्थानकावर वृद्ध महिलेची सोन्याची माळ लंपास;पाच महिला आरोपींना अटक.. कोतवाली पोलिसांची जलद कारवाई  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमका...

 बसस्थानकावर वृद्ध महिलेची सोन्याची माळ लंपास;पाच महिला आरोपींना अटक.. कोतवाली पोलिसांची जलद कारवाई 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-केडगाव बस स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन एका वृद्ध महिलेच्या बॅगेतून सुमारे अडीच तोळे सोन्याची मोहनमाळ चोरी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पाच संशयित महिला आरोपींना ताब्यात घेतले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ताराबाई महादेव शेलार या केडगाव बस स्थानकावरून पुणे बाजूकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये चढताना प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत आरोपींनी शेलार यांच्या बॅगेची चेन अत्यंत शिताफीने उघडली. बॅगेच्या आतील कप्प्यात ठेवलेली ७८ आणि ८१ मणी असलेली, सुमारे अडीच तोळे वजनाची आणि ३ लाख रुपये किमतीची सोन्याची मोहनमाळ आरोपींनी चोरून नेली.या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत मंजुळा व्यंकटेश मौंदा, गिता राजु मौंदा, सरीना अशोक मौंदा, भारती शिवा मौंदा आणि लक्ष्मी रामु मौंदा (सर्व रा. लासुर रोड, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) या पाच महिलांना आरोपी म्हणून निष्पन्न केले आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार रोहिणी दरंदले करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना नागरिकांनी आपल्या दागिन्यांची व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे,विभागीय पोलीस अधिकारी दिलीप टीपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील,पोलीस अमलदार संतोष बनकर,दौंड,साबीर शेख,रोहिणी दरंदले,विशाल दळवी,अविनाश वाकचौरे,राहुल शिंदे,दीपक रोहकले,सत्यम शिंदे,अमोल गाडे,सुरज कदम,दत्तात्रय कोतकर,शिरीष तरटे,अतुल काजळे,महेश पवार,रमेश शिंदे, अतुल लाटे, पल्लवी रोगले दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केली आहे.

No comments