adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गांधी फाउंडेशन जळगावच्या ‘राज्यस्तरीय स्वच्छ शाळा – सुंदर शाळा’ उपक्रमात जे.ई. स्कूल, मुक्ताईनगरचा उत्स्फूर्त सहभाग

गांधी फाउंडेशन जळगावच्या ‘राज्यस्तरीय स्वच्छ शाळा – सुंदर शाळा’ उपक्रमात जे.ई. स्कूल, मुक्ताईनगरचा उत्स्फूर्त सहभाग  प्रा. सतीश गायकवाड, मुक...

गांधी फाउंडेशन जळगावच्या ‘राज्यस्तरीय स्वच्छ शाळा – सुंदर शाळा’ उपक्रमात जे.ई. स्कूल, मुक्ताईनगरचा उत्स्फूर्त सहभाग 


प्रा. सतीश गायकवाड, मुक्ताईनगर

(संपादक : हेमकांत गायकवाड)

गांधी फाउंडेशन, जळगाव यांच्या “राज्यस्तरीय स्वच्छ शाळा – सुंदर शाळा” या उपक्रमांतर्गत जे.ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. ३० जानेवारी रोजी शालेय परिसर स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस शाळेचे प्राचार्य मा. व्ही. एम. चौधरी सर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपप्राचार्या व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक व्ही. डी. ब-हाटे, के. आर. कवळे, तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शालेय परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित केले. स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असावा, असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात एस. आर. ठाकूर सर यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. स्वच्छता, साधेपणा आणि समाजहित या गांधीवादी मूल्यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

No comments