adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गोवंश कत्तलीचा कट उधळला..१३ गोवंशीय जनावरांची सुटका..४ आरोपींना अटक..LCB ची धडक कारवाई.. तब्बल ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

 गोवंश कत्तलीचा कट उधळला..१३ गोवंशीय जनावरांची सुटका..४ आरोपींना अटक..LCB ची धडक कारवाई.. तब्बल ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त  सचिन मोकळं अहिल्य...

 गोवंश कत्तलीचा कट उधळला..१३ गोवंशीय जनावरांची सुटका..४ आरोपींना अटक..LCB ची धडक कारवाई.. तब्बल ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे कत्तलीसाठी चालविण्यात आलेल्या 13 गोवंशीय जनावरांची सुटका करत 4 आरोपीं कडून 39 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांवर तसेच कत्तलीसाठी चालविण्यात येणाऱ्या गोवंशीय जनावरांची सुटका करून संबंधित आरोपीं विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते.या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि.राजेंद्र वाघ,पोलीस अंमलदार अतुल लोटके,दीपक घाटकर,सोमनाथ झांबरे,बाळासाहेब नागरगोजे, योगेश कर्डीले व किशोर शिरसाठ यांचे पथक तयार करून नेवासा तालुक्यात कारवाईसाठी रवाना करण्यात आले.दि.03/02/2026 रोजी पहाटेच्या सुमारास पथक गोवंश कत्तलीसंदर्भात माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत कृष्णानगर,घोडेगाव,ता.नेवासा येथे काही इसमांनी गोवंशीय जनावरे खरेदी करून वाहनामध्ये भरून कत्तलीसाठी नेणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता काही इसम मातीच्या ढिगाऱ्यावरून गोवंशीय जनावरे ट्रकमध्ये भरत असल्याचे दिसून आले.पथकाने तत्काळ कारवाई करून त्या इसमांना ताब्यात घेतले.चौकशीत त्यांनी त्यांची नावे 1) रशिद जानुभाई शेख (वय 65, रा. घोडेगाव, ता. नेवासा), 2) अमीन इसाक सय्यद (वय 30, रा. लोहगाव, ता. नेवासा), 3) लाला उर्फ आफताब हारुन शेख (वय 26, रा. घोडेगाव, ता. नेवासा) व 4) शुभम बाबासाहेब पुंड (वय 26, रा. माळीचिंचोरा, ता. नेवासा) अशी असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपींकडून 9 लाख 10 हजार रुपये किमतीची 13 गोवंशीय जनावरे तसेच 30 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक (क्र. एम.एच. 46 ए.आर. 6385) असा एकूण 39 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. 32/2026 नुसार महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 (सुधारित 2015) चे कलम 5 (अ), 5 (ब), 9 तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविणे अधिनियमाचे कलम 3, 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस ठाणे करीत आहे.

No comments