adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मलकापूर आगार: महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या २०२६-२७ च्या नूतन कार्यकारिणीची घोषणा..!! मलकापूर आगार व्यवस्थापक श्री. मुकुंदजी न्हावकर यांना निवडीचे पत्र सादर; सुशिल झनके यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा.

 मलकापूर आगार: महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या २०२६-२७ च्या नूतन कार्यकारिणीची घोषणा..!! मलकापूर आगार व्यवस्थापक श्री. मुकुंदजी न्हावकर यांन...

 मलकापूर आगार: महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या २०२६-२७ च्या नूतन कार्यकारिणीची घोषणा..!!

मलकापूर आगार व्यवस्थापक श्री. मुकुंदजी न्हावकर यांना निवडीचे पत्र सादर; सुशिल झनके यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा. 


अमोल बावस्कार बुलढाणा 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर: महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या मलकापूर आगाराची सन २०२६-२७ या वर्षाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या नूतन कार्यकारिणीच्या निवड दिनांक ११/०२/२६ बुधवार रोजी श्री. दिपक चांभारे पाटील, शिवसेना तालुका प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली   बिनविरोध निवड करण्यात आली. त्याबाबतची अधिकृत माहिती आणि पत्राची प्रत आगार व्यवस्था प्रमुख श्री. मुकुंदजी न्हावकर यांना विभाग प्रमुख श्री. उमेशजी पवार व शिष्टमंडळाद्वारे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी आगार प्रमुखांशी चर्चा करताना, कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, कामाचे नियोजन आणि कामगार कल्याण या विषयांवर संघटनेने आपली भूमिका मांडली. श्री. न्हावकर यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नूतन कार्यकारिणी २०२६-२७ (मलकापूर आगार)

खालीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत, मलकापूर आगार  अध्यक्ष श्री. सुशिल राहुल झनके, सचिव श्री. गजानन शालीग्राम लवंगे, सहसचिव श्री. यू. पी. खताळ, कार्याध्यक्ष श्री. एस. यु. जगदाळे तसेच श्री. जगदीश राठोड, कोषाध्यक्ष श्री. एस. आर. नाटकर, संघटक श्री. संतोष भागवत वसतकार, प्रसिध्दी प्रमुख श्री. हिम्मतसिंग चंदुसिंग झाकडे, उपाध्यक्ष श्री. संदीप यु. जायभाये, कायदेशिर सल्लागार, श्री. अजयकुमार पाचपोळ, सहसंघटक श्री. सुनील नारायण बोर्ड, महिला प्रतिनिधी सौ. प्रतिभाताई कोळी या सर्वांची  बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

कामगार हितासाठी कटिबद्ध

नवनियुक्त अध्यक्ष श्री. सुशिल झनके यांनी यावेळी बोलताना सांगितले की, "प्रशासकीय नियमांचे पालन करत असतानाच कामगारांच्या अडचणींना वाचा फोडणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असेल."

या निवडीमुळे मलकापूर आगारातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सर्वच स्तरांतून या नूतन टीमचे अभिनंदन केले जात आहे.

"कामगारांच्या हितासाठी संघटना आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. नवीन कार्यकारिणी आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्कीच यशस्वी होईल."

— श्री. दिपक चांभारे पाटील,

शिवसेना, मलकापूर तालुकाप्रमुख

No comments