adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्यानगर हादरलं...फोन नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून तरुणाचा संताप अनावर..एकतर्फी प्रेमातून नृत्यांगणावर मध्यरात्री कोयत्याने प्राणघातक हल्ला

 अहिल्यानगर हादरलं...फोन नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून तरुणाचा संताप अनावर..एकतर्फी प्रेमातून नृत्यांगणावर मध्यरात्री कोयत्याने प्राणघातक हल...

 अहिल्यानगर हादरलं...फोन नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून तरुणाचा संताप अनावर..एकतर्फी प्रेमातून नृत्यांगणावर मध्यरात्री कोयत्याने प्राणघातक हल्ला 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:- जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात पुन्हा एकदा थरकाप उडवणारी घटना समोर आली असून, ‘फोनवर बोलत नाहीस… नंबर ब्लॉक का केला?’ या क्षुल्लक कारणातून एकतर्फी प्रेमाने पछाडलेल्या तरुणाने नृत्यांगणा असलेल्या तरुणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जामखेड तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. पीडित महिला पेशाने नृत्यांगणा असून,हल्ल्यानंतर तिला गंभीर अवस्थेत उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने तिचा जीव वाचला असला तरी ती अजूनही उपचाराखाली आहे.या प्रकरणातील आरोपीचे नाव राहुल अशोक कचरे (रा. खळेगाव,ता.गेवराई,जि.बीड) असे असून,आरोपीने एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पीडित तरुणीने आरोपीचा फोन नंबर ब्लॉक केल्याचा राग मनात धरून,आरोपीने मध्यरात्रीच्या सुमारास जामखेड शहरातील तपनेश्वर भागात तिच्या घराजवळ कोयत्याने हल्ला केला.हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात प्राणघातक हल्ल्यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वीच जामखेड येथील एका कला केंद्रातील नृत्यांगणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडल्याने शहरात संतापाची आणि भीतीची लाट पसरली आहे.महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की,आरोपी विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. आरोपीला लवकरच अटक करून कठोरात कठोर कारवाई केली जाईल.या घटनेने एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या गुन्ह्यांचे भयावह वास्तव पुन्हा समोर आणले असून,महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

No comments