adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची निशब्द प्रेरणा माता रमाई होत्या - अतिशभाई खराटे

 सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची निशब्द प्रेरणा माता रमाई होत्या - अतिशभाई खराटे  अमोल बावस्कार बुलढाणा संपादक हेमकांत गायकवाड  वंचित बहुजन आघ...

 सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची निशब्द प्रेरणा माता रमाई होत्या - अतिशभाई खराटे 


अमोल बावस्कार बुलढाणा

संपादक हेमकांत गायकवाड 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मलकापूर येथे रमाई जयंती साजरी करण्यात आली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःच्या वेदना न बोलता, बाबासाहेबांच्या विचारांची मशाल अखंड पेटती ठेवण्याचे महान कार्य माता रमाई यांनी केले. त्या केवळ बाबासाहेबांच्या जीवनसंगिनी नव्हत्या, तर सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची निःशब्द प्रेरणा, संघर्षाची ऊर्जा आणि माणुसकीचा जिवंत आदर्श होत्या. त्यांच्या संयम, समर्पण आणि त्यागामुळेच सामाजिक न्यायाची चळवळ अधिक भक्कम झाली. माता रमाई यांचे जीवन हे प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असून, त्यांचा संघर्ष आजही आपल्याला माणूस म्हणून अधिक संवेदनशील आणि जबाबदार बनवतो असे प्रतिपादन अतिशभाई खराटे वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा महासचिव यांनी मलकापूर येथे माता रमाई जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले 


    स्थानिक रेल्वे स्टेशन जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे कोट्यावधी दिन दुबळ्यांची माता, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, प्रथमतः प्रमुख मान्यवरांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वंचितचे तालुकाध्यक्ष विजय झनके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, भा.बौद्ध म.माजी जिल्हाध्यक्ष एस.एस.वले, वंचितचे जी.उपाध्यक्ष यशवंत कळासे, जी.सचिव तुळशीराम वाघ, जी.संघटक भाऊराव उमाळे, तालुका महासचिव गणेश सावळे, धम्मपाल उमाळे, यासीनभाई कुरेशी, भा.बौद्ध म. माजी तालुकाध्यक्ष राजू शेगोकार, एम.ओ.सरकटे यांची उपस्थिती होती 


       याप्रसंगी दिलीप वाघ, मधुकर निकम, महिला तालुकाध्यक्षा पौर्णिमा इंगळे, दीपमाला इंगळे, रमेश गोरे, नरसिंग चव्हाण, गजानन झणके, इलियास काझी, कडू धुरंदर, बाबुराव वानखेडे, गौतम तायडे, अजय वानखेडे, सुपडा धुरंदर, मोहन गवई, विमलाकर ठाकरे, निनाजी झणके, सुनील वानखेडे, किशोर मोरे, विनोद इंगळे, संजय झनके चंद्रभान झनके, संघपाल तायडे, यशवंत इंगळे, गौतम गुरचळ, संजय मोरे, सुपडा इंगळे, गौतम गवई, अजय निकम, रमा होडघरे, वैशाली प्रधान, मंदा इंगळे, लता वानखेडे, सरला थाटे, इंदुबाई इंगळे वनमाला अंदुरकर, उज्वला इंगळे, प्रतिभा अंदुरकर, रंजना इंगळे आदीं उपस्थित होते 


No comments