adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथील शिवजयंती निमित्त भव्य मोटारसायकल रॅली व मिरवणुकीचे आयोजन

 यावल येथील शिवजयंती निमित्त भव्य मोटारसायकल रॅली व मिरवणुकीचे आयोजन  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : यावल येथील शिवरत्न फ...

 यावल येथील शिवजयंती निमित्त भव्य मोटारसायकल रॅली व मिरवणुकीचे आयोजन 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : यावल येथील शिवरत्न फौंडेशनच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, धर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मैदानावर भव्य मोटारसायकल रॅली तसेच आकर्षक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वराज्य, शौर्य, पराक्रम आणि न्याय यांचे तेजस्वी प्रतीक असलेल्या महाराजांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्व शिवप्रेमी एकत्र येणार आहेत. या प्रेरणादायी व अभिमानास्पद क्षणी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजा मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. यावल तालुका व परिसरातील शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रुपेश अरुण कोळी व उत्सव समितीच्या सदस्य कार्यकारणी यांनी केलेले आहे

No comments