adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेगावात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा; नारी परिवर्तन बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

 शेगावात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा; नारी परिवर्तन बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम  अमोल बावस्कार बुलढाणा : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शेगा...

 शेगावात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा; नारी परिवर्तन बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम 


अमोल बावस्कार बुलढाणा :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शेगाव येथे आज मराठी भाषा दिनानिमित्त नारी परिवर्तन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मराठी राजभाषेच्या गौरवगीताने करण्यात आली. उपस्थितांनी मराठी भाषेच्या जतन व संवर्धनाचा संकल्प केला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. चेतना खेते यांनी मराठी भाषा दिनाचे महत्त्व सविस्तरपणे उपस्थितांसमोर मांडले. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि ओळखीची शान आहे, असे त्यांनी सांगितले. संत साहित्य, समाजसुधारकांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत मराठी भाषेचे असलेले योगदान त्यांनी अधोरेखित केले. नवीन पिढीने मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिचा दैनंदिन व्यवहारात अधिकाधिक वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान नारी परिवर्तन बहुउद्देशीय संस्थेची स्थापना, उद्दिष्टे आणि सामाजिक कार्याची माहिती देण्यात आली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, सामाजिक जनजागृतीसाठी आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी संस्था सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले. याच वेळी संस्थेला प्राप्त झालेले अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र सर्व पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना प्रदान करण्यात आले. प्रमाणपत्र वितरणानंतर उपस्थितांनी आनंद व्यक्त केला आणि संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष सौ.प्रणिता कलोरे, सचिव सौ देवका उंबरकार, सहसचिव सौ. योगिता बोरोकार कोषाध्यक्ष सौ रेणुका जोशी(वडोदकर) ,  सदस्या सोनाली डीखोळकर.शोभा भोपळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता बोरोकार यांनी केले. शेवटी आभार सोनाली डीखोळकर यांनी मानले. मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित या उपक्रमाला माजी सैनिक संघटनेचे कोषाध्यक्ष वडोदकर साहेब,तसेच लोकमत चे पत्रकार डिजिटल मिडीया परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल उंबरकर, तसेच कृष्णा वडोदकर यांनी शुभेच्छा दिल्या.

No comments