adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

माहिती अधिकार प्रकरणी नाशिक विभागीय आयुक्तांचे कारवाईचे आदेश

  माहिती अधिकार प्रकरणी नाशिक विभागीय आयुक्तांचे कारवाईचे आदेश चोपडा प्रतिनिधी  माहिती अधिकार कायद्यान्वये वेळेत माहिती न दिल्याच्या तक्रारी...

 माहिती अधिकार प्रकरणी नाशिक विभागीय आयुक्तांचे कारवाईचे आदेश


चोपडा प्रतिनिधी 

माहिती अधिकार कायद्यान्वये वेळेत माहिती न दिल्याच्या तक्रारींची दखल घेत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) अरविंद लोखंडे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

श्री. हेमकांत बळीराम गायकवाड (पत्रकार), जिल्हाध्यक्ष – ऑल इंडिया ब्लू टायगर सेना, चोपडा (जि. जळगाव) यांनी जानेवारी २०२६ मध्ये ई-मेलद्वारे सादर केलेल्या तक्रारींनुसार शहादा, चाळीसगाव, अमळनेर व जळगाव येथील संबंधित जन माहिती अधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रथम अपील अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतरही निर्धारित मुदतीत माहिती उपलब्ध करून दिली नाही. काही प्रकरणांत १५ दिवस तर काही ठिकाणी सात दिवसांच्या आत माहिती देण्याचे आदेश असूनही त्याचे पालन झाले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक यांना तक्रारींची नियमांनुसार चौकशी करून संबंधितांवर माहिती अधिकार कायद्यान्वये योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

या आदेशामुळे माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीत शिथिलता दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

No comments