प्रदेश काँग्रेसच्या 'विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग प्रमुखपदी ॲड. पल्लवीताई रेणके यांची नियुक्ती किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- ह...
प्रदेश काँग्रेसच्या 'विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग प्रमुखपदी ॲड. पल्लवीताई रेणके यांची नियुक्ती
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या 'विमुक्त जाती व भटक्या जमाती सेल'चे रूपांतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत 'विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग' असे करण्यात आले असून काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून ॲड. पल्लवीताई रेणके यांची विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातींची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या किमान ११% आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या हेतूने समाजातील या अतिदुर्लक्षित व वंचित समाज घटकाला न्याय मिळण्यासाठी काँग्रेस पक्षाने राज्याच्या निर्मितीपासूनच या समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण देऊ केले आहे. परंतु कडकलक्ष्मी, वैदू, गोंधळी, जोशी, वासुदेव, बहुरूपी, भराडी, डोंबारी, भोई ,टकारी, रामोशी, लमाण या व अश्या सुमारे ४० जमाती आजही त्यांच्या पारंपरिक भटकंती व व्यवसायामुळे संघटित झालेल्या नाहीत. तसेच विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकलेल्या नाहीत. अशा विखुरलेल्या व वंचित समुदायास संघटित करण्याचा निश्चय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतला आहे. या कामाचे महत्त्व जाणून काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या 'विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाला बळकटी देण्याचे ठरविले आहे.
ॲड. पल्लवीताई रेणके यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती केल्याबद्दल प्रांताध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांचं मनःपूर्वक आभार व अभिनंदन.
एडवोकेट पल्लवीताई रेणके यांचे अभिनंदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस व्ही जे एन टी विभागाचे महासचिव सुधाकर बडगुजर,प्रदेश सचिव अनिल वाडीले, जळगाव जिल्हा काँग्रेस व्हि .जे.एन.टी विभाग जिल्हा अध्यक्ष प्रा. विशाल पवार, जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव, प्रदेश प्रवक्ते एडवोकेट अरविंद गोसावी, जळगाव शहर काँग्रेस महानगर अध्यक्ष श्याम भाऊ तायडे व जळगाव जिल्हा काँग्रेस तर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

No comments