adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धरणगावात माधुरी फिल्म प्रोडक्शन चा भव्य शुभारंभ सोहळा...

 धरणगावात माधुरी फिल्म प्रोडक्शन चा भव्य शुभारंभ सोहळा... विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगांव - शहरातील धरणी चौक राष्ट्र...

 धरणगावात माधुरी फिल्म प्रोडक्शन चा भव्य शुभारंभ सोहळा...


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगांव - शहरातील धरणी चौक राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले स्मारक येथे माधुरी फिल्म प्रोडक्शन चा भव्य शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोहळ्याचे प्रास्ताविक महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा माजी विद्यार्थी तथा दिग्दर्शक समाधान सुरेश माळी यांनी केले. माळी समाजाचे अध्यक्ष व्ही टी माळी सर व धरणगाव नगरीचे उपनगराध्यक्ष विजय धनलाल महाजन यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील, नगरसेवक परमेश्वर महाजन, लक्ष्मण महाजन, पवन महाजन उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले स्मारकाचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

           " बरबाद केलं गं तू " या गाण्याचे चित्रीकरण धरणगाव शहरात पार पडले लवकरच "माधुरी फिल्म प्रोडक्शन " या चॅनलला येणार आहे असे दिग्दर्शन समाधान सुरेश माळी धरणगाव यांनी सांगितले. याप्रसंगी अभिनेत्री स्वीटी साळुंखे, अभिनेता अक्षय दाभाडे वं मॉडेल दिघू व संपूर्ण चित्रीकरणाची टीम उपस्थित होती. याप्रसंगी पुढील गाण्याच्या चित्रीकरणासाठी व्ही टी माळी व पी डी पाटील यांनी माधुरी प्रोडक्शनच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

No comments